
भारत-पाकिस्तान मॅचवर फुसकी भविष्यवाणी केली, बाबा आता म्हणतो भविष्यावर विश्वास ठेवायचा नाही.
भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, भारताने कितीही प्रयत्न केला तरी, यावेळी पाकिस्तानचाच विजय होणार आहे, अशी भविष्यवाणी आयआयटी बाबाने केली होती. आता हीच भविष्यवाणी म्हणजे फुसका बार निघाला आहे. आता चुकीची भविष्यवाणी केल्यानंतर याच आयआयटी बाबाने प्रतिक्रिया दिली आहे.आयआयटी बाबाने एका यूट्यूबरला मुलाखत दिली होती.
या मुलाखतीत आयआयटी बाबाने भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर भविष्यवाणी केली होती. या सामन्यात पाकिस्तानचाच विजय होणार आहे, असं भविष्य या बाबाने सांगितलं होतं. सोबतच भारताने कितीही जोर लावाल तरी, विराट कोहलीने कितीही जोर लावला तरी भारत यावेळी जिंकू शकणार नाही, असंही हा आयआयटीयन बाबा म्हणाला होता. आता मात्र त्याचं हे भविष्य पूर्णपणे फसलं आहे. भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय.भारताने पाकिस्तानला सहा गडी राखून पराभूत केलंय. संपूर्ण सामन्यात एकदाही पाकिस्तान भारतावर कुरघोडी करू शकला नाही. उलट भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला.
या विजयानंतर आता आयआयटीयन बाबा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आयआयटीयन बाबाने ज्या यूट्यूबरसोबत बोलताना ही भविष्यवाणी केली होती, त्याच यूट्यूबरने आयआयटीयन बाबाशी फोनवरून संपर्क साधला आणि तुमची भविष्यवाणी चुकीची ठरली, तुमचं काय मत आहे? असं विचारलं. विशेष म्हणजे या प्रश्नावर आयआयटीयन बाबाने अत्यंत चलाखीने उत्तर दिलंय. “यातून एकच संदेश घ्यायचा. तो म्हणजे कोणाच्याही भविष्यवाणीवर विश्वास ठेवायचा नाही. स्वत:चं डोकं लावायचं,” असं आयआयटीयन बाबाने म्हटलंय.