
देवरुख विलास रहाटे यांच्या रांगोळीचे केंद्रीय मंत्र्यांकडून कौतुक
मुंबई विद्यापिठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र व श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या संविधान अमृत महोत्सवाच्या ”हमारा संविधान हमारा अभिमान” या कार्यक्रमासाठी देवरूखच्या विलास रहाटे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाची रांगोळी साकारली होती. या रांगोळीचे केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी कौतुक केले.
मुंबई विद्यापिठात आयोजित ”हमारा संविधान, हमारा अभिमान” या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार हे प्रमुख पाहुणे होते. या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सचिव अमित यादव, अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, कुलगुरू रवींद्र कुलकर्णी हे उपस्थित होते.

अध्यासन केंद्रात रहाटे यांनी साकारलेली रांगोळी पाहून केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार भावूक झाले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबाबत आदर व्यक्त करून नमस्कार केला. डॉ. वीरेंद्र कुमार यांनी एका विशेष समारंभासाठी रांगोळी साकारण्याकरिता रहाटे यांना दिल्लीत येण्याचे आमंत्रण दिले आहे. मंत्री चंद्रकांतपाटील यांनीही रहाटेंचे भरभरून कौतुक केले.