
दापोली तालुक्यातील आगरवायंगणी येथे पोलिसांनी छापा टाकत गावठी बनावटीची बंदूक व एअर पिस्टल, शिकारीकरीता वापरण्यात येणा-या बॅट-या केल्या जप्त.
दापोली तालुक्यातील आगरवायंगणी येथे दाभोळ पोलिसांनी छापा टाकत गावठी बनावटीची बंदूक व एअर पिस्टल, शिकारीकरीता वापरण्यात येणा-या बॅट-या व रिकाम्या वापरलेल्या काडतुसाच्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत.
दिनांक २१/०२/२०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी ओकार नथुराम बालगुडे, वय ३१ वर्षे, रा. मधलीवाडी, आगरवायंगणी, ता. दापोली यांचे राहते घरी गावठी बनावटीची बंदूक व एअर पिस्टल, शिकारीकरीता वापरण्यात येणा-या बॅट-या व रिकाम्या वापरलेल्या काडतुसाच्या पुंगळ्या आढळुन आल्या गैरकायदा व बिगरपरवाना बाळगले स्थिती मिळून आला. एकुण ४४००/- किंमतीचा माल जप्त करण्यात आदा आहे.