
दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या ८१ व्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीत रॅली, सहभोजन आणि सहभजन कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

भक्तीभूषण दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या ८१ व्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सहभोजन आणि सहभजनाचा कार्यक्रम आज (२४ फेब्रुवारी) रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात झाला. त्याला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी रॅली काढण्यात आली.




सहभोजनाच्या कार्यक्रमापूर्वी भंडारी समाज संघाच्या वतीने श्री देव भैरी मंदिर खालची आळी येथील श्रीदेव भैरी मंदिर येथून शहरात रॅली काढण्यात आली.

यात रत्नागिरीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली प्रमोद महाजन क्रीडा संकुल जवळून आठवडा बाजार येथून एसटी बसस्थानक, जयस्तंभ ते मारुती मंदिर अशी मार्गक्रमणा करत पुन्हा मारुती मंदिर येथून जयस्तंभ रामआळी मार्गे पतितपावन मंदिरापर्यंत येऊन समाप्त झाली.


या रॅलीत अनेकजण आकर्षक वेशभूषा साकारून सहभागी झाले होते.




