ठाकरेसेनेला आमदार शेखर निकम यांनीही मोठा धक्का दिला.

चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे नाहीत. सावर्डे येथे शुक्रवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत दोन्ही तालुक्यातील ८ सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करत ठाकरे गटाला धक्का दिला. प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले तर पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी नव्या, जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन पुढील वाटचाल करू, सर्वांना सन्मान देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी शिंदे शिवसेनेने ठाकरेसेनेला धक्का दिल्यानंतर आमदार शेखर निकम यांनीही मोठा धक्का दिला. सावर्डेतील जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत असुर्डे सरपंच पंकज साळवी, आंबतखोल सरपंच आत्माराम बांबाडे, आंगवली सरपंच अरूणा अणेराव, आरवली सरपंच नीलेश भुवड, मावळंगे सरपंच प्रकाश वीर, आंगवली माजी सरपंच संतोष अणेराव आदींनी प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश पक्षाला बळकटी देणारा ठरेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button