
ज्येष्ठ मराठी साहित्यिक, दूरदर्शनचे माजी वृत्त निवेदक अनंत भावे यांचं निधन.
साहित्यिक आणि दूरदर्शनवरील माजी वृत्त निवेदक प्रा. अनंत भावे यांच निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. सध्या ते पुण्यातील बाणेर परिसरात वास्तव्यास होते. तिथेच त्यांचं निधन झालं.प्रा. अनंत भावे यांनी माणूस साप्ताहिकामधून स्तंभलेखन केलं होतं. तसेच त्यांनी मुंबईतील सोमय्या महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केलं होतं.
पुढे दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या वृत्तनिवेदनाच्या खास शैलीमुळे ते प्रसिद्ध झाले होते.अनंत भावे यांनी मराठीतील बाल साहित्याला दिलेलं योगदान हे विशेष असं आहे. त्यांनी लहान मुलांसाठी कथा, कवितांची अनेक पुस्तकांचं लेखन केलं होतं. बालसाहित्यामधील योगदानासाठी त्यांना २०१३ साली साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता.