
गुहागर तालुक्यातील भातगाव येथील शासकीय वाळू डेपोवरील ३ कामगारांना मारहाण करणाऱ्या आरोपींला अटक.
गुहागर तालुक्यातील भातगाव येथील शासकीय वाळू डेपोवरील ३ कामगारांना ते झोपेत असताना त्यांच्या खोलीत प्रवेश करून चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली.या प्रकरणी गुहागर पोलिसांनी विराज विजय कदम (३२, भातगाव, तिसंग) याला शनिवारी अटक करण्यात आली असून पसार झालेल्या तिघांचा शोध सुरू आहे.वाळू व्यवहारातील रकमेवरून वाद झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले.भातगाव तिसंग येथील शासकीय वाळू डेपोवरील क्रेन ऑपरेटर मोहन गणपत महतो (४३), निलकंठ महतो, धनु महतो हे तिघे कामगार असून १९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास भातगाव तिसंग येथील खोलीवर जेवण करून झोपले होते.२० रोजी रात्री १ च्या सुमारास या तिघांना चौघांनी येऊन दांडक्याने मारहाण करत जखमी करून काळोखात पसार झाले. या तीनही कामगारांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.