
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत
रत्नागिरी, दि. 24 : सन २०२४-२५ मध्ये अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत आणि जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पासून प्रत्यक्षरीत्या व ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.२५ फेब्रुवारी असून मा.आयुक्त, समाज कल्याण, ३, चर्च पथ,पुणे-०१ यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावयाचे आहेत.000