नीलेश राणेंनंतर काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली राजकीय निवृत्ती


दसऱ्यानिमित्त आज सिमोल्लंघनाचा दिवस असताना राज्याच्या राजकारणातून दोन व्यक्तींनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी ट्विटद्वारे निवृत्ती जाहीर केली तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी देखील निवृत्तीचे संकेत दिले आहेत.सोलापुरात धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सुशील कुमार शिंदे यांनी पुढच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना शिंदे म्हणाले, “मी हे जाहीरपणे सांगितलेलं आहे की प्रणिती ताईच काँग्रेसच्या उमेदवार राहतील. मी तर आता राजकारणातून निवृत्त झाल्यासारखाच आहे. पण जी काही मदत लागेन ती मी करत राहीन हे मी तुम्हाला सांगतो.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button