
सुट्ट्या पैशांच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका, क्यूआरकोड सुविधा उपलब्ध.
एस.टी बसमध्ये सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये अनेक वेळा वादावादीचे प्रसंग घडतात. मात्र आता हा प्रकार थांबण्याची शक्यता आहे. एस.टी. महामंडळाने प्रवासी तिकिटासाठी विकसित केलेल्या एन्ड्राईड मशिनमध्ये ऑनलाईन पेमेंटसाठी फोन पे, गुगल पे यांच्यासाठी क्यूआरकोड सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे सुट्टया पैशांच्या कटकटीतून आता प्रवाशांची सुटका झाली आहे.अलिकडच्या काळात ऑनलाईन आर्थिक व्यवहार वाढले आहेत. अशा व्यवहारांच्या माध्यमातून जगासोबत चालण्यासाठी आता लालपरीही सज्ज झाली आहे.
एस.टी. महामंडळाने प्रवासी तिकिट दरात वाढ केली आहे. यातूनच प्रवासी तिकिटांच्या सुट्ट्या पैशांचा प्रन ऐरणीवर आला होता. या पैशांसाठी कधीकधी प्रवासी व वाहक यांच्यात बाचाबाचीचे प्रसंगही घडत होते. या गोष्टीचा विचार करून आता प्रवासी तिकिटासाठी विकसित झालेल्या एन्ड्रॉईड मशिनला ऑनलाईन पेमेंटसाठी फोन पे, गुगल पेसाठी क्युआर कोड सुविधा उपलब्ध केल्याने तिकिटांसाठी सुट्टे पैसे देण्याऐवजी प्रवासी आता ऑनलाईन पेमेंटला पसंती दर्शवित आहेत.www.konkantoday.com