शाश्‍वत परिषदेची मागणी रिफायनरीसह अन्य प्रदूषणकारी प्रकल्प नको.

निसर्गरम्य कोकणात रिफायनरी व अन्य प्रदूषणकारी प्रकल्प प्रस्तावित करू नये, अशी मागणी शाश्‍वत कोकण परिषदेतर्फे महाराष्टाचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आलीशाश्‍वत कोकण परिषदेतर्फे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची मुंबई येथे भेट घेण्यात आली.

यावेळी त्यांना शाश्‍वत कोकण परिषदेच्या कोकणाविषयीच्या धोरणात्मक मागण्यांचा मसुदा देण्यात आला.निसर्गसंपन्न कोकणात रिफायनरी व अन्य प्रदूषणकारी प्रकल्प प्रस्तावित करू नये, असे ठामपणे मांडण्यात आले. तसेच कोकणात रोजगार व समृद्धीसाठी शासनकर्ते व नितीकर्ते यांच्यासोबत संवादाची भूमिका राहिल, असे सांगण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button