
राजापूर वनविभागाकडून विनापरवाना दोन कातभट्ट्या सील.
कातभट्टी व्यवसायाबाबत शासनाच्या निर्देशानुसार व जिल्हा वनविभागाच्या आदेशानुसार राजापूर वनविभागाच्यावतीने राजापूर तालुक्यातील २ विनापरवाना कातभट्ट्या सील करण्यात आल्याची माहिती राजापूर वनविभागाच्यावतीने देण्यात आली.कातभट्टी व कात उद्योगाबाबत शासनाने पर्यावरणाचा धोका होवू नये, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे कातभट्टी व्यावसायिकांवर कठोर निर्बंध आणले आहेत. जिल्हा वनविभागाच्यावतीने सर्वच कातभट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत. राजापूर तालुक्यातही जिल्हा वनविभागाच्या आदेशानुसार २ कातभट्ट्या नुकत्याच सील करण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com