रत्नागिरी शहरात छावा सिनेमाची रत्नागिरीकरांना पडली भूल.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रचिती आणून देणार्‍या छावा सिनेमाने रत्नागिरीतही धूम माजवली आहे. येथील सिटीप्राईड या चित्रपटगृहातील पुढच्या रविवारपर्यंतचे तिन्ही थिएटरचे या सिनेमाचे सर्व शो हाऊसफुल्ल आहेत. येथील बॉक्स ऑफिसवर १४ तारखेला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तुफान गल्ला जमवला आहे.दरदिवशी होणार्‍या १४ शोच्या माध्यमातून गेल्या ६ दिवसात सुमारे दीड कोटी रुपयांची कमाई केली आहे.

छावा हा मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आगामी हिंदी भाषेतील ऐतिहासिक सिनेमा आहे. यात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यासोबत विक्की कौशल मुख्य भूमिकेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या सिनेमामध्ये उभा आहे. हा चित्रपट तरूण पिढीने उचलून धरला आहे. सर्व थरातील लोकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

येथील सिटी प्राईडमध्ये तीन सिनेमागृहांमध्ये छावा सिनेमाला रत्नागिरीकर प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला आहे. येथील तिन्ही सिनेमागृहांची आसन क्षमता सुमारे सहाशे नव्वद आहे पण ते सर्व शो हाऊसफुल्ल आहेत. विशेष म्हणजे पुढच्या रविवारपर्यंत हे शो हाऊसफुल्ल आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button