
रत्नागिरीतील ज्येष्ठ वकिलांची तैलचित्रे प्रेरणा देत राहतील, न्यायमूर्ती माधव जामदार
वकिलाने आपले काम सचोटीने केले पाहिजे, वकिली हा उद्योग नाही. आपण कशा पद्धतीन काम करतोय याकडे लक्ष राहिले पाहिजे. रत्नागिरीतील ज्येष्ठ वकिलांची स्मृति ठेवून वारसा जपला पाहिजे. त्यांनी केलेले काम आपण शिकले पाहिजे. त्यांची तैलचित्रे नेहमीच प्रेरणा देत राहतील, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालक तथा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी केले.जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीत बार असोसिएशनच्या नव्या हॉलच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी रत्नागिरीतील नामवंत वकील स्व. बापूसाहेब परूळेकर, स्व. केतन घाग, स्व. मुसा डिंगणकर आणि स्व. नारायण तथा नाना गवाणकर यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जामदार यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी, बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. विलास पाटणे, ज्येष्ठ वकील फजल डिंगणकर उपस्थित होते.www.konkantoday.com