
बंदी असूनही उरूस साजरा करणार्यांविरोधात गुन्हा दाखल
राजापूर शहरातील मच्छिमार्केटलगतच्या वास्तूत उरूस साजरा करण्यासाठी मागितलेली परवानगी जमावबंदी आदेश असल्याने राजापूर पोलिसांनी नाकारली होती. असे असतानाही जमावबंदी आदेश झुगारून उरूस साजरा केल्याप्रकरणी अल्ताफ कासम बारगीर व त्यांचे सहकारी मन्सूर काझी, सुलतान ठाकुर (रा. राजापूर) यांसह ५० ते ६० जणांवर राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी पत्रकारांना दिली.
येथील मच्छिमार्केटलगत असलेली ऐतिहासिक वास्तू हे पुरातन सूर्यमंदिर असल्याचे नमूद करत येथे मुस्लिम समाजातील काही व्यक्तींनी अतिक्रमण केले. ते १९ फेब्रवारी रोजी येथे उरूस कार्यक्रम करणार आहेत, त्याला प्रतिबंध करावा, असी मागणी हिंदू समाजाच्यावतीन एका लेखी निवेदनाद्ऐारे बुधवारी राजापूर पोलिसांकडे करण्यात आली होती. दरम्यान अल्ताफ कासम बारगीर यांनी येथे उरूस साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र प्रशासनाकडून १६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आल्याने आपणाला उरूस साजरा करण्यास परवानगी देता येणार नाही, असे नमूद करत पोलिसांनी बारगीर यांना उरूस साजरा करण्यास परवानगी नाकारली होती व तसे लेखी पत्र दिले होते. असेही केडगे यांनी सांगितले. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही जमावबंदी आदेश असतानाही संबंधितांकडून येथे उरूस साजरा करण्यात आला व जेवणही ठेवण्यात आले होते.www.konkantoday.com