
५ ते १०% दरवाढीचा वीज ग्राहकांना शॉक; महावितरणच्या दर निश्चितीवर मंगळवारी सुनावणी.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल वीज दर निश्चितीच्या प्रस्तावात विजेचे दर कमी करण्यात आले आहेत, असा दावा महावितरणने केला आहे.प्रत्यक्षात फिक्स चार्ज (स्थिर आकार) १२ ते १५ टक्क्यांनी वाढविला असून, व्हेरिएबल चार्ज वाढविला नसल्याचे म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे.मात्र, दोन्हीपैकी एक दर जरी वाढले तरी वाढीव वीज बिलाचे पैसे ग्राहकांच्याच खिशातून जाणार आहेत.ग्राहकांना ५ ते १० टक्के वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. मंगळवारी, २५ फेब्रुवारीला नवी मुंबईमधील सिडको भवनमध्ये महावितरणच्या वीज दर निश्चितीच्या प्रस्तावावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर या प्रस्तावित दरांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र हे दर लागू होण्यापूर्वी वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी दरवाढीबाबत विश्लेषण केले आहे.
शंभर युनिटपर्यंत दिलासामहावितरणसोबतच बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवरच्या घरगुती वीज ग्राहकांचे एप्रिल महिन्याचे वीज बिल ५ ते १० टक्क्यांनी वाढीव येणार असून, १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना जेमतेम दिलासा मिळणार आहे.महावितरणने प्रस्तावात २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये ३५ ते ४० टक्क्यांनी शेतीसाठीची विजेची मागणी वाढवून दाखवली आहे. त्यामुळे तोटा वाढला. विजेची खरेदी वाढली, असे महावितरण म्हणत आहे. प्रत्यक्षात तसे नाही. वीज खरेदीचा खर्च वाढवून दाखविण्यात आल्याने या वाढीचा परिणाम पुढील तीन वर्षांवर होणार आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.