
हर्णै बंदरातून मासळीची आवक घटल्याने नौका किनार्यावर
हर्णै बंदरातून मासेमारीला जाणार्या मच्छिमारांना दोन ते तीन दिवस समुद्रात फिरून मासळी पुरेशी मिळत नसून डिझेलचा खर्चदेखील सुटत नसल्याचे समोर येत आहे. हा एलईडीचा, पर्ससीननेटचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात ८०० ते ९०० नौका मासेमारीसाठी जातात.
मात्र सध्या समुद्रात मासेच मिळत नाहीत, दोन ते तीन दिवसांनी येणारा मच्छिमार किरकोळ प्रमाणात मासे आणत आहे. यामुळे बोटीवर कामाला असणार्या माणसांचा, डिझेल असा खर्च सुटत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. समुद्रात वाढणारी एलईडी मासेमारी यामुळे सारी छोटी मोठी मासळी चोरून नेली जात आहे. यामुळे पारंपाारिक मासेमारी करणार्यांच्या पदरात निराशा पडत आहे.www.konkantoday.com