
सिंधुदुर्ग येथील तारकर्ली समुद्रात पुण्यातील पाच पर्यटक बुडाले; दोघांचा मृत्यू तर तिसरा गंभीर!
मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात पुणे येथील पाच पर्यटक बुडाले होते. त्यापैकी दोघे जणांनी जीव गमावला आहे. दोघेजण बचावले असून एक जण गंभीर आहे. तारकर्ली समुद्रात पुणे येथील पर्यटक अंघोळ करण्यास जात असताना तेथील नागरिकांनी त्यांना खबरदारी घेण्याची सुचना केली होती मात्र ती धुडकावून लावत ते खोल समुद्रात गेले.
या पाच बुडालेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न झाला. पण दोघांचा मृत्यू झाला तर तिसरा गंभीर आहे. अन्य दोघे जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.