सावर्डेतील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट येथे शिवरायांची ३० चित्रे रेखाटून दिली मानवंदना.

सावर्डेतील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३० चित्रे रेखाटून त्यांना बुधवारी जयंतीनिमित्त कलात्मक पद्धतीने मानवंदना देण्यात आली. या चित्रांचे आता प्रदर्शन भरवण्यात आले आहे.पारंपारिक कार्यक्रमांना फाटा देत या कला महाविद्यालयाने ही शिवजयंती कलात्मक पद्धतीने साजरी केली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यावर विद्यार्थ्यांनी पोवाडे गायले, भाषणे केली.

त्यानंतर महाराजांना खास मानवंदना म्हणून त्यांच्या जीवनावर आधारित ३० चित्रे काढली. मोठ्या गटात अद्वज चव्हाण, सौरभ साठे, प्रथमेश गोंधळी यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. सिद्धार्थ भोवड याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. लहान गटात भूषण वेलये, साहिल परुळेकर, ज्योती पांचाळ हे पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी ठरले. भार्वी गोरूले हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन आठ दिवस कला महाविद्यालयाच्या कलादालनात भरवण्यात आले आहे. ते सर्व कला रसिकांसाठी खुले राहणार असून त्याला सर्वांनी भेट द्यावी असे आवाहन कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button