विद्यार्थीदशेत वैज्ञानिक दृष्टीकोन देणारा ग्रामपंचायतीचा हा अनोखा उपक्रम कौतुकास्पद : सहा. पो. नि. कुलदीप पाटील

रत्नागिरी:तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण संरक्षण या विषयावर आधारित वैज्ञानिक प्रयोग सादरीकरण या उपक्रमांतर्गत ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीच्या कार्यालयात महसूल गाव कांबळे लावगण, पन्हाळी व सत्कोंडी या गावातील शालेय विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले. या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर जयगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटीलसाहेब हे बोलत होते. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, असे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेली जि. प. शाळा पन्हाळीची चौथीची विद्यार्थीनी शर्वरी येलये ही आपल्या प्रकल्पाचे स्पष्टीकरण देत असतानाची तिची वैज्ञानिक समज पाहून उपस्थित भारावून गेले. यावेळी बोलतांना सरपंच सतिश थुळ म्हणाले की, ही नवीन पिढी उद्याचे भविष्य आहे. आणि भविष्यातील वाटचाल सुखद होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन प्रगल्भ असायला हवा.

ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले. रांगोळी स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, व वैज्ञानिक प्रयोग असे उपक्रम घेण्यात आले , त्यांचे बक्षिस वितरण यावेळी करण्यात आले. यासमयी जेष्ठ कलाशिक्षक शशिकांत पेढे सर, उपसरपंच चंद्रकांत मालप, सदस्य अरुण मोर्ये, अजय काताळे, प्रणाली मालप, समिक्षा घाटे, ग्रामसचिव श्रीकांत कुळ्ये, बीएसएनएल शाखा अभियंता नितीन बैकर, पो. पा. श्रीकांत खापले, सुहानी बलेकर, शिक्षक वर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुळ्ये तर सुत्र संचालन अरुण मोर्ये यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button