रत्नागिरीत प्रथमच भारतीय गणित कार्यशाळा.

भारतीय गणितावर तीन दिवस होणार विचारमंथनकेंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या आर्थिक सहयोगाने,कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र, वेदांग ज्योतिष विभाग, रामटेक आणि संस्कृत विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, रत्नागिरीत प्रथमच दिनांक 24 ते 26 फेब्रुवारी 2025 रोजी “भारतीय गणित” या विषयावर त्रिदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.

ही कार्यशाळा गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात पार पडणार आहे.विज्ञान, आरोग्य, कृषी अशा विविध आणि प्रत्येक क्षेत्रात तत्कालीन भारतीय जाणकारांनी विशेष प्रयत्न केले आणि येत्या पिढीला ज्ञानकुंभ उपलब्ध करून दिला.याच भारतीय ज्ञान परंपरेतील एक विषय अर्थात गणितशास्त्र..भारतीय गणित हे कालौघात मागे पडू नये शिवाय त्याबाबत जागृती व्हावी , भारतीय गणिताचे महत्व सर्वदूर पसरावे व भारतीय गणिताला आधुनिकतेची जोड देऊन त्यात संशोधन व्हावे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे.या कार्यशाळेसाठी अत्यंत जाणकार मान्यवर येणार आहेत. यात या मान्यवरांची व्याख्याने देखील अनुभवता येणार आहे.

यात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे गणित विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख प्रा राजीव सप्रे 24 फेब्रुवारी – “वैदिक गणित” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.त्याचप्रमाणे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील वेदांग ज्योतिष विभागाचे शोधछात्र अन्वेष देवुलपल्ली 25 फेब्रुवारी – “द भास्कराचार्य क्लासरूम” या विषयावर मार्गदर्शन करणार असून गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सहयोगी 26 फेब्रुवारी – प्रा बाबासाहेब सुतार हे भारतीय खगोल गणित विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, 25 फेब्रुवारी – भारतीय गणिताचा इतिहास व व्यापकता विषयावर कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील वेदांग ज्योतिष विभागाचे अधिष्ठाता कृष्णकुमार पांडेय आपले विचार मांडणार आहेत. 25 व 26 फेब्रुवारी – रोजी चाणक्य विद्यापीठातील कला, मानव्य व समाज विभागातील सहयोगी प्रा रामकृष्ण पेजात्ताय Indian Number System, Playful Mathematics: Selections from Lilavati and Bijaganit,Meru Prastara of Pingal या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील डी बी जे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा माधव बापट 26 फेब्रुवारी – fruits of numbers या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.ही कार्यशाळा निःशुल्क असून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 7219054097 स्वरूप काणे या क्रमांकावर संपर्क साधावा.*नावनोंदणीसाठी या लिंक *https://forms.gle/VK3vft66DpNaFoqd7*तरी रत्नागिरीकरांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button