बँक ऑफ इंडियामध्ये २२६.८४ कोटींचा ‘फ्रॉड’, ओडिशास्थित गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरकडून फसवणूक!

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाची ओडिशास्थित गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने सुमारे २२६.८४ कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेला अहवाल दिला आहे. गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरकडील कर्ज बँकेने बुडीत कर्ज (एनपीए) म्हणून घोषित केल्याचे अहवालात म्हटले आहे.

गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरच्या २२६.८४ कोटी रुपयांच्या बुडीत कर्जासाठी बँकेने २१२.६२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे त्यात म्हटले आहे.*डिसेंबरअखेर समाप्त तिसऱ्या तिमाहीत, बँक ऑफ इंडियाच्या निव्वळ नफ्यात ३५ टक्क्यांनी वाढ होऊन तो २,५१७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत १,८७० कोटी रुपये नोंदवला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून १९,९५७ कोटी रुपये झाले आहे, जे वर्षपूर्वी याच कालावधीत १६,४११ कोटी रुपये होते. शिवाय बँकेचे व्याज उत्पन्न मागील वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत १५,२१८ कोटी रुपयांच्या तुलनेत १८,२१० कोटी रुपये झाले आहे. शुक्रवारच्या सत्रात बँक ऑफ इंडियाचा समभाग ३.०८ टक्क्यांनी घसरून १०१.५१ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, बँकेचे ४६,२१४ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button