कुंभ स्नान करणाऱ्या महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ टेलिग्रामवर विकले, लातूर-सांगलीतून दोघांना अटक.

कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवून ते टेलिग्राम आणि युट्युबवर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तपासादरम्यान आरोपींकडे महिलांचं आक्षेपार्ह फुटेजही सापडले आहे.याप्रकरणी लातूर आणि सांगलीमधून दोघांना अटक करण्यात आली आहे.19 फेब्रुवारीला राजकोटच्या पायल हॉस्पिटलमध्ये महिलांच्या चेकअपचे व्हिडिओ युट्युबवर अपलोड केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. गुजरात पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करताना महाराष्ट्रातून दोन आरोपींना अटक केली. या दोघांच्या चौकशीनंतर पोलिसांनी प्रयागराजमधून युट्युबर चंद्रप्रकाश फुलचंदला अटक केली. चंद्रप्रकाशने त्याच्या चॅनलवर 55 ते 60 व्हिडिओ अपलोड केले होते. याप्रकरणी लातूरमधून प्रज्वल अशोक तेली आणि सांगलीमधून प्रज राजेंद्र पाटील यांना अटक केली.

अहमदाबादच्या सायबर क्राईम डीसीपी लवीना सिन्हा यांनी सांगितलं की, तपासात तिघांनी महाकुंभमध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ दुसऱ्या चॅनलना विकले. चंद्रप्रकाश फुलचंद स्वत: व्हिडिओ बनवायचा. हे व्हिडिओ तो स्वत:च्या चॅनलवर अपलोड करायचा आणि ऑनलाईन विकायचा. आरोपीच्या टेलिग्राम चॅनलवर 100 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत.हे आरोपी महागड्या रेटने व्हिडिओ विकायचे. तसंच या आरोपींनी देशातल्या 60-70 हॉस्पिटलचे सीसीटीव्ही हॅक केल्याचा संशयही पोलिसांना आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button