
कशेडी बोगद्यात प्रत्येकी २० पंखे बसवण्याचे काम अखेर पूर्ण.
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यात प्रत्येकी २० पंखे बसवण्याचे काम अखेर पूर्ण झाले असून बोगद्यातील किरकोळ कामांच्या पूर्ततांना वेग आला आहे. वीजेसाठी भरावी लागणारी ८० लाखांची अनामत रक्कम जमा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती प्रक्रियाही वेगाने सुरू आहे.
आता दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होण्याची प्रतीक्षा आहे. दुसरा बोगदा वाहतुकीसाठी नेमका कधी खुला होईल, हे मात्र महामार्ग खात्याकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.www.konkantoday.com