
अखेर नागरिकांच्या नाराजीची दखल, रत्नागिरी शहरातील काँक्रिटीकरणाच्या रस्त्याच्या टप्प्याचे डांबरीकरण.
रत्नागिरी शहरात सध्या मुख्य रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण सुरू आहे. मात्र आगामी काळात पाईपलाईन घालण्यासाठी काँक्रिटीकरण सलग न करता तुकड्यांमध्ये करण्यात येत आहेत करण्यात येत आहे. मात्र या काँक्रिटीकरणाच्या रस्त्यावर चढण्यासाठी केलेले भराव कच्च्या पद्धतीने केले होते. त्यामुळे त्या ठिकाणची खडी व वाळू घसरून खडी रस्त्यावर आली होती, व त्यामुळे अपघात होत होते याशिवाय नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता.
पूर्वीचे रस्ते

दुचाकी व अन्य रिक्षा व छोट्या वाहनांचे नुकसान होत होते याबाबत कोकण टुडे ने वृत्त प्रसिद्ध करून वस्तुस्थिती संबंधितांसमोर आणली होती त्यामुळे आता दोन दिवसापासून काँक्रिटीकरणाच्या रस्त्यावर जाणाऱ्या हे कच्चे भराव आता आता डांबरीकरणाने पक्के बनवण्यात येत आहेत.
कोकण टुडे ने वृत्त प्रसिद्ध करून वस्तुस्थिती समोर आणल्या नंतर रस्त्याची होत असलेली सुधारणा.


त्याचे काम आता दोन दिवसापासून सुरू झाले आहे संबंधित यंत्रणेने दखल घेतल्याने आता नागरिकांचे मोठी समस्या दूर झाली आहे तरीदेखील कॉंक्रिटीकरण झालेल्या रस्त्याचा उर्वरित भागाचे डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी होत आहे