
मुंबई चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल ,रुग्णांची संख्या फसवी -भाजप आमदार प्रसाद लाड
मुंबईत चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत रुग्णांची संख्या ही फसवी सांगितली जात आहे मुंबईत तपासण्याची संख्या वाढवण्याची गरज आहे भारतीय जनता पक्षाने ही मागणी केली की राजकारण करत असल्याचा आरोप केला जात आहे हे बरोबर नाही असे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यानी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले
मुंबईतील चाकरमान्यांची तपासणी करून त्यांना रत्नागिरी, सिंधुदुर्गात पाठवावे, अशी चर्चा दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांसोबत सुरू आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी दिली.
कोरोनाप्रतिबंधक टाळेबंदीमुळे मुंबईतील एका छोट्याशा घरात १५-२० जणांना राहावे लागत आहे. सुमारे ४५ ते ५० लोकांमागे एक शौचालय असावे, असा निकष असताना धारावीसारख्या हॉटस्पॉट भागात ३०० लोकांमागे एक शौचालय आहे.मुंबई महापालिका आणि राज्य शासन यांच्यात कोणताही समन्वय नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईत चाकरमान्यांचे हाल होत आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट करणा-यांनी मोबाइल टॉयलेटची व्यवस्था आधी करायला हवी, असे लाड म्हणाले.
www.konkantoday.com