
राजापूर शहरातही उबाठा सेनेला उतरती कळा, माजी नगरसेवक गोविंद चव्हाण यांचा पक्षप्रवेश.
उबाठा शिवसेनेचे तत्कालीन उपनेते तथा राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांच्या ना. एकनाथ शिंदे शिवसेनेतील प्रवेशाच्यावेळी शहरातील उबाठाच्या पदाधिकार्यांनीही संघटनेला सोडचिठ्ठी देत श्री. साळवी यांची पाठराखण केली आहे. यामध्ये शहरातील प्रभाग क्रमांक एकचे माजी नगरसेवक गोविंद चव्हाण व त्यांच्या समर्थकांचादेखील समावेश आहे.
या पक्षप्रवेशामुळे राजापूर शहरातदेखील उबाठा सेनेला उतरती कळा लागल्याचे दिसू लागले आहे.उबाठाचे माजी नगरसेवक गोविंद चव्हाण हे प्रभाग एकमधून भाजपातून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी उबाठा सेनेत प्रवेश केला होता. आता त्यांनी माजी आमदार राजन साळवी यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशानंतर त्यांच्यासोबत शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.www.konkantoday.com