महामार्ग चौपदरीकरणात अनधिकृत खोक्यांमुळे पीकअप शेडचे काम रखडले.

मुंबई-गोवा महामार्गावरील उन्हाळे गंगातीर्थ फाट्यानजिक असलेल्या अनधिकृत दुकान खोक्यामुळे पिकअप शेडचे काम रखडले गेले आहे. हा अनधिकृत खोका हटवून पिकअप शेडचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे व जनतेला सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उन्हाळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केली आहे.

उन्हाळे गावातील महिलांनी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता यांची भेट घेत याबाबत निवेदन सादर केले आहे. दरम्यान, अशीच स्थिती मुंबई-गोवा महामार्गावर जिल्ह्यातील अन्य ठिकाणी दिसत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button