
पेपर तपासणीवर बहिष्काराच्या निर्णयावर अंशतः अनुदान शिक्षक ठाम.
महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदान शिक्षकांना दि. १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार वाढीव टक्के वेतन अनुदानाचा टप्पा तात्काळ मिळावा या मागणीसाठी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदानीत शाळा कृती समितीच्या रत्नागिरी जिल्हा उच्च माध्यमिक शिक्षकांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत जोवर शासन दि. १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत बोर्डाचे पेपर तपासले जाणार नाहीत. पेपरचे गठ्ठे बोर्डात परत करण्यावर शिक्षक ठाम आहेत. निर्णयाशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा बैठकीत निर्णय झाला.www.konkantoday.com