
लोटे औद्योगिक वसाहतीसाठीची जमीन गेलेल्या जमीन मालकांना अद्याप मोबदला नाही
लोटे औद्योगिक वसाहतीसाठीची पाण्याची पाईपलाईन ही पेढे गावातून गेलेली आहे. फरशीपासून लोटे पर्यंत १९८२ साली टाकण्यात आलेल्या या पाईपलाईनसाठी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना जमिनीचा मोबदला अथवा भाडे आजपर्यंत मिळालेले नाही. नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात आलेले नाही. तसेच प्रकल्पग्रस्त म्हणून साधा दाखलाही देण्यात आलेला नसल्याने आतातरी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा अशी मागणी करणारे निवेदन प्रकल्पग्रस्तांकडून लोटे उद्योजक संघटनेला देण्यात आले आहे. www.konkantoday.com