
दोन दिवसांत पुण्यात धमाका, मोठे नेते करणार ठाकरेंना जय महाराष्ट्र; मंत्री उदय सामंताचा दावा.
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर महाविकास आघाडीला गळती लागली आहे. या पक्षगळतीचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसत आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहेसिलसिला अजूनही कायम आहे. शिंदे गटातील नेतेही मोठे दावे करत आहेत. आताही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. दोन दिवसांत पुण्यातील काही नेते आमच्या पक्षात येणार आहेत.
कोण आमच्या पक्षात प्रवेश करणार त्यांची नावे मी सांगणार आहे, असा दावा मंत्री सामंत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.राज्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर सुरू आहे. या अंतर्गत ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते शिंदेसेनेत दाखल होत आहेत. या मोहीमेबद्दल बोलताना सामंत म्हणाले, ऑपरेशन टायगर हे नाव पत्रकारांनीच दिलं आहे. राज्यात बाळासाहेब ठाकरेंचा विचार एकनाथ शिंदे पुढेघेऊन जात आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत.