
चिपळूण येथे स्थानक सुशोभिकरण कामाची खातेनिहाय चौकशी करावी, रूपेश पवार यांची मागणी.
चुकीच्या व गैरप्रकाराने चिपळूण रेल्वे स्टेशन सुशोभिकरण कामाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आल्याने खातेनिहाय चौकशी करावी, तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी व बिलाची रक्कम अदा करू नये, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता रत्नागिरी यांच्याकडे भ्रष्टाचार मुक्त जनसंरक्षण समितीचे अध्यक्ष रूपेश पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या कामाच्या चौकशीच्या मागणीने खळबळ उडाली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, चिपळूण बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता व त्यांच्या सहकारी अधिकारी वर्गाने सुमारे साडेचार कोटी रुपयांचे चिपळूण रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरणाचे काम चुकीच्या व गैरप्रकारच्या माध्यमातून मंजूर केल्याचा माझा स्पष्ट आरोप आहे. चिपळूण येथील अधिकारी वर्ग व ठेकेदार यांच्यामध्ये संगनमत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. किंबहुना छुपी पार्टनरशीप आहे, असा स्पष्ट आरोप आहे. या अगोदर याच ठेकेदाराला ज्या पद्धतीने काम आणि बिले मंजूर करण्यात आली आहेत, त्यावरून या विषयाचीही निपक्षपातीपणे चौकशी होणे गरजेचे आहे. या कामावर यापूर्वी अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे.www.konkantoday.com