
चिपळुणातील शासकीय इमारती धूळखात पडून, माजी सभापती शौकत मुकादम यांनी शासनावर केली टीका
चिपळूण शहरात अनेक शासकीय इमारती सध्या धुळखात पडून आहेत. या इमारतींच्या दुरूस्तीच्यादृष्टीन कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याने त्या कोसळण्याच्या स्थितीत आहेत. एकीकडे इमारतीची दुरूस्ती केली जात नसतानाच दुसरीकडे काही कार्यालये मात्र भांड्याच्या जागेत सुरू आहेत. त्यामुळे शासनाचा हा अंदाधुंद कारभार थांबणार कधी, असा सवाल पंचायत समिती माजी सभापती शौकत मुकादम यांनी केला आहे.चिपळूण तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक इमारती दुरूस्तीअभावी विनापरवानापडून आहेत. सदर इमारतीमध्ये सध्या गवताचे साम्राज्य पसरले आहे.
काविळतळी येथील परशुराम नगरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन-चार इमारती घाणेकर हॉस्पिटलच्या लगत एक इमारत या सार्वजनिक बांधकामच्या इमारती नादुरूस्त आहेत. तसेच कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या इमारती अशाच पद्धतीने पडून आहेत.www.konkantoday.com