
एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ साठी लांजा केंद्र क्रमांक ६६०१ ची बैठक व्यवस्था सज्ज.
लांजा :- दिनांक २१ फेब्रुवारी पासुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत कोकण विभागीय मंडळामार्फत सुरू होणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी- मार्च २०२५ साठी न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा केंद्र क्रमांक ६६०१ ची बैठक व्यवस्था पूर्ण झाली असून लांजा केंद्र परीक्षा घेण्यास सज्ज झाले आहे. लांजा केंद्र क्रमांक ६६०१ वर नियमित व रिपीटर मिळून एकूण ७७४ विद्यार्थी असून त्यासाठी एकूण ३१ परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. केंद्राच्या बाहेर बैठक व्यवस्था व इमारतीच्या कक्षा प्रमाणे नकाशा ठळकपणे दर्शविण्यात येणार आहे.
या केंद्रावर प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी निर्भयपणे व शांत मनाने परीक्षा द्यावी.लांजा केंद्रावर विविध माध्यमांचे तसेच तालुक्यातील विविध १४ हायस्कूलचे विद्यार्थी असल्यामुळे बैठक व्यवस्था सतत बदलती राहणार आहे. त्यामुळे पुढच्या पेपरची बैठक व्यवस्था आदल्या दिवशी त्यांनी पाहून जावी.सदर परीक्षा केंद्र क्रमांक ६६०१ येथे BO11767 ते BO12534 या परीक्षार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. तरी कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण निर्माण झाल्यास लांजा केंद्राचे केंद्र संचालक व्ही. एम. आजगांवकर,उपकेंद्र संचालक एम.ए. वाघाटे, आर.सी. वासुरकर,एम.ए. सय्यद यांच्याशी संपर्क साधावा.
परीक्षा कक्षात जाण्यापूर्वी प्रवेशद्वारावरच सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार असून,स्वतःचे लेखन साहित्य व्यतिरिक्त कॉपी म्हणून समजली जाईल. असे आक्षेपार्ह इतर कोणतेही साहित्य विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात घेऊन जाऊ नये. कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन लांजा ६६०१ चे केंद्र संचालक व्ही. एम. आजगांवकर,व मुख्याध्यापक एस. एस. पाटोळे यांनी केले आहे.