
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा-बांबोळी येथे रुग्णाला घेऊन जाणार्या 108 रुग्णवाहिकेने अचानक वाटेतच पेट घेतला.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा-बांबोळी येथे रुग्णाला घेऊन जाणार्या 108 रुग्णवाहिकेने अचानक वाटेतच पेट घेतला. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. ही घटना सोमवारी रात्री 1 वा.च्या सुमारास कोलवाळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडलीसुदैवाने रुग्णाला तात्काळ बाहेर काढल्यामुळे अनर्थ टळला.
गाडीत पुढे बसलेल्या डॉक्टरांना गाडीतून धूर येताना दिसला. त्यामुळे रुग्णांसह सर्वजण वेळीच बाहेर पडले. त्यानंतर म्हापसा येथील अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. रुग्णांना अन्य एका रुग्णवाहिकेने उपचारासाठी बांबोळीकडे नेण्यात आले. संबंधित रुग्णवाहिका ही दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे.