संरक्षित असलेल्या रान कोंबड्याची शिकार करणाऱ्या दोघांवर कारवाई.

संरक्षित असलेल्या रान कोंबड्याची शिकार करणे दोन इसमांना महागात पडले असून वन विभागाने या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे त्यामुळे अवैधरित्या शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या राहते घराचे मागील बाजूस रान कोंबड्याची शिकार झालेबाबत वन अधिकारी यांना कळविण्यात आले त्या माहितीच्या आधारे वन अधिकारी यांनी जागेवर जावून वस्तुस्थितीची पाहणी केली असता, तक्रारदार यांचे राहते घराचे मागील बाजूस १०० मीटर अंतरावर असणारे श्री. रुपेश भिकु झाडेकर यांचे राहते घराकडे दोन इसम रान कोंबडा शिकार करून घेवून गेले असल्याचे तक्रारदार यांनी समक्ष दाखविले.

त्या नुसार श्री. रुपेश भिकु झाडेकर यांचे पडवीमध्ये जावून पाहणी केली असता त्या ठिकाणी दोन इसम संशयित नितीन शांताराम झाडेकर, व ३४ रा. कुंभवे ता. दापोली जि. रत्नागिरी आणि संशयित आशिष अशोक पेडमकर, व. ३२, रा. वाकवली ता. दापोली जि. रत्नागिरी हे जखमी अवस्थेतील रानकोंबडा वछऱ्याचे बंदुकीसह आढळून आलेने त्या दोघांना ताब्यात घेवून त्यांचेवर वन्यजीव (संरक्षण) १९७२ -सुधारणा – २०२२ कलम २, ९, ३९, ४८, ५०, ५१, ५२, ५७ अन्वये श्री. आर.डी. खोत वनपाल दापोली यांचेकडील वन अपराध क्रमांक ०८/२०२५ दि. १७.०२.२०२५ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेणेत आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button