
मुंबईचे दिग्गज क्रिकेटपटू मिलिंद रेगे यांचे निधन.
मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि निवडकर्ता मिलिंद रेगे यांचे बुधवारी (१९ फेब्रुवारी) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.गेल्या रविवारीच त्यांनी ७६ वा वाढदिवस साजरा केला होता. रेगे यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते, बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.