नागपूर रामटेकममधील सेक्स रॅकेटमध्ये रत्नागिरीतील उच्चशिक्षित तरुणी!


नागपूर शहरातील अनेक मोठमोठ्या हॉटेलसह ब्युटी पार्लर, मसाज सेंटर, स्पा सेंटर, पंचकर्म केंद्र आणि युनिसेक्स सलूनमध्ये बिनधास्तपणे देहव्यापार सुरु असतो. मात्र, आता देहव्यापाराचे लोण ग्रामीण भागातही पसरले आहे. कोलकाता, दिल्ली, गोवा, हरियाणा, आसाम, जम्मू काश्मीर याराज्यासह पुणे, मुंबई, रत्नागीरी, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमधील तरुणींना नागपुरात सेक्स रॅकेटमध्ये सहभागी करण्यात येत आहे. नुकताच रामटेकमधील एका मोठ्या हॉटेलवर पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात रत्नागीरीच्या उच्चशिक्षित तरुणीला आंबटशौकिन ग्राहकासह पकडण्यात आले. या प्रकरणी हॉटेलमालकासह सहा जणांवर रामटेक पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

रामटेकमधील नगरधन येथे असलेले अमरज्योती लॉज अँड रेस्ट्रॉरेंट हे आंबटशौकीन ग्राहकांसाठी प्रसिद्ध आहे. या हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील तरुणींसह अन्य राज्यातील तरुणी देहव्यापार करण्यासाठी येत असतात. दिल्ली, मुंबई आणि कोलकाताच्या तरुणी महिन्याभराचा करार करुन सेक्स रॅकेटमध्ये सहभागी होत असतात. एका तरुणीला हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आणि जवळपास ८० हजार ते एक लाख रुपयांमध्ये २५ दिवसांचा करार केल्या जाते. दिल्ली आणि मुंबईच्या तरुणी विमानाने प्रवास करतात.

तसेच या तरुणींना फार्महाऊस आणि विशेष आयोजित पार्ट्यांमध्ये तरुणींना पाठवण्यात येते. रामटेकमधील हॉटेलमध्ये आंबटशौकीन ग्राहकांनी पैसे मोजल्यानंतर काही तरुणींचे फोटो दाखवले जातात. फोटोतील तरुणींची निवड केल्यानंतर त्या तरुणीला ग्राहकासोबत पाठवल्या जाते. या प्रकारामुळे शहर आणि ग्रामीण भागातील अनेक आंबटशौकिनांची गर्दी या हॉटेलमध्ये वाढली होती. रामटेकचे ठाणेदार आसाराम शेट्ये यांना माहिती मिळताच त्यांनी बनावट ग्राहक पाठवून देहव्यापार सुरु असल्याची खात्री केली. त्यानंतर सापळा रचून कारवाई करीत रत्नागिरीच्या तरुणीला देहव्यापार करताना ताब्यात घेतले. तिची रवानगी नागपुरातील महिला सुधारगृहात करण्यात आली. ती तरुणी पूर्वी मुंबईत एका मोठ्या हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटशी जुळलेली होती.

तरुणींचे आर्थिक शोषण

रामटेक-नगरधनमधील अमरज्योती लॉज अँड रेस्ट्रॉरेंटमध्ये आरोपी हॉटेलमालक प्रशांत कामडी, गोपी ठाकूर आणि मॉंटी नगरे यांनी देहव्यापार सुरु केला होता. अनुराग विजय गौर, आकाश घिरसिंग बिरवे आणि राहुल प्रेम रॉय हे तिघे आंबटशौकिन ग्राहकांना हॉटेलमध्ये घेऊन जात होते. रत्नागीरीतील पीडित तरुणीने अभियांत्रिकीची पदवी घेतली असून ती मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच देहव्यापाराशी जुळली होती. मॉंटीने तिला नागपुरात देहव्यापार करण्यासाठी बोलावले होते. हॉटेलमालक आणि मॉंटी नगरे हे एका ग्राहकाकडून १० ते १५ हजार रुपये घेत होते. मात्र, पीडित तरुणीला केवळ एक हजार रुपये देऊन तिचे आर्थिक शोषण करीत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button