
नवी मुंबईतील ३० नगरसेवकांची भाजपमध्ये घरवापसी
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर आता वारं बदललं आहे. शिवसेनेमध्ये मेगा भरती सुरू आहे. तर दुसरीकडे आता भाजममध्येही घरवापसी सुरू झाली आहे. नवी मुंबईमध्ये भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेले नगरसेवक पुन्हा एकदा भाजपमध्ये आले आहे.जवळपास ३० नगरसेवकांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना आता वेग आला आहे.
नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक पुन्हा भाजपात दाखल झाले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थिती हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मंत्री गणेश नाईक सुद्धा उपस्थितीत होते. संदीप नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जाताना काही माजी नगरसेवक देखील सोबत गेले होते. अशात, हे सर्व माजी नगरसेवकांनी आता पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला आहे.