
जीबीएसची दहशत वाढली? केंद्रीय आरोग्यमंत्री घेणार मोठा निर्णय,राज्यातील यात्रांवर निर्बंध आणणार?
राज्यासह पुण्यात जीबीएसचा कहर सूरूच आहे. पुण्यासोबत या आजाराने आता इतर जिल्ह्यात हायपाय पसरायला सुरूवात केली आहे.त्यामुळे रुग्णसंख्या आणि मृतांच्या संख्येत वाढत होत चालली आहे.त्यामुळे जीबीएसचा हा वाढता प्रादुर्भाव पाहता आता केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यातील व बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच यात्रा यावर निर्बंध आणण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे आता जर रुग्णसंख्या वाढली तर कोणत्याही क्षणी निर्बंध येण्याची शक्यता आहे.राज्यात अनेक ठिकाणी जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.
जीबीएसचा हा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, जीबीएस हा आजार जर गर्दीमुळे आणि संसर्गजन्य असल्याची माहिती मिळाली तर वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील व बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच यात्रा यावर निर्बंध आणण्याबाबत विचार सुरू असल्याचं संकेत प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत