
भोस्ते घाटात कारला पाठीमागून एसटीची धडक; 4 जणांना दुखापत
खेड : रत्नागिरीहून वसईला जाणा-या मोटारीला पाठीमागून येणाऱ्या एसटी बसची धडक बसली.
मुंबई – गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात हा अपघात झाला. या अपघातात मोटारीतून प्रवास करणारे चौघेजण जखमी झाले.
रत्नागिरीमधील निरुळ ठीकवाडी येथील प्रवीण प्रकाश ठिक, राजेश्री भालचंद्र बोबंल, वैजयंती विक्रम ठिक, कुणाल विक्रम ठिक हे कार
( एमएच ४६ एन ३९११) मधून दि.८ रोजी रत्नागिरी येथून वसई येथे जाण्यासाठी प्रवास करत होते. कार भोस्ते घाटातील गतिरोधकाजवळ आली असता पाठीमागून येणाऱ्या एस.टी.बस(एमएच २० बीएल १५०९) वरील चालकाचा बसवरचा ताबा सुटून मोटारीला पाठीमागून धडक बसली. या अपघातात मोटारीतून प्रवास करणारे जखमी झाले. जखमींना कलंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती प्रविण प्रकाश ठिक(रा. ठिक वाडी, निरूळ, ता.जि. रत्नागिरी) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. एसटी बस चालक इर्शाद इलाही शेख (वय ४० रा.कांदळगांव, परांदा-उस्मानाबाद) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.