
करजुवे ते संगमेश्वर मार्गावर एसटीच्या वाहकाचा चालत्या गाडीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.
करजुवे ते संगमेश्वर मार्गावर एसटीच्या वाहकाचा चालत्या गाडीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील घारेवाडी गावच्या हद्दीत ही टाकणारी घटना घडली. तुकाराम कुंडलिक माने (वय – 42), असे वाहकाचे नाव आहे.करजुवे येथून देवरुख डेपोची सकाळी 6.15 च्या दरम्यान सुटणाऱ्या वस्तीच्या चालत्या गाडीत एसटी वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
संगमेश्वर तालुक्यात येणाऱ्या घारेवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली. तुकाराम कुंडलिक माने वय (वर्षे 42) असे वाहकाचे नाव आहे. त्याचे मूळ गाव जोडवाडी बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील आहे. पुंडलिक कुटुंबावर मोठा आघात कोसळला आहे. तर वाहकाच्या मृत्यूच्या घटनेने एसटी वाहक, चालकांमधून सुद्धा हळहळ व्यक्त केली जात आहे.