
आमदार किरण सामंत यांनी केली छावा चित्रपट सवलतीच्या दराने दाखवण्याची मागणी
छत्रपती संभाजी महाराजांचे नेतृत्व शौर्य आणि बलिदान तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा बाबत छावा या चित्रपटात द्वारे जगासमोर दाखवण्यात आले आहे.शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल जागरूकता आणण्यासाठी सदरचा चित्रपट 50% सवलतीने दाखवल्यास शासनाचे महत्त्वाचे योगदान ठरेल.
छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून त्यांनी महाराष्ट्र व देशाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले असल्याने त्यांच्या जीवनावर आधारित छावा हा हिंदी चित्रपट शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलतीने दाखवणे बाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी आमदार किरण सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.