भंडारी श्री-2022‘ च्या चांदीच्या गदेचा मानकरी ठरला आशिष विलणकर

शाश्वत मानकर खुला गटातून विजेता ठरला

रत्नागिरी जिल्ह्यात मानाची समजली जाणारी भंडारी श्री ही स्पर्धा शुक्रवारी पार पडली. स्वा. वि. दा. सावकर नाटयगृहात पार पडलेल्या या शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘भंडारी श्री-2022‘ चा मानकरी ठरला आशिष विलणकर. त्याला रोख पारितोषिक, आकर्षक चषक आणि मानाची चांदीची गदा देवून भंडारी युवा प्रतिष्ठानतर्फे गौरवण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील 90 शरीरसौष्ठव खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
दरम्यान खुल्या गटातून ‘भंडारी श्री-2022‘ विजेता ठरला तो शाश्वत मानकर. त्याला रोख पारितोषिक, चषक देउन गौरवण्यात आले. सलग दोन वर्षे खुल्या गटातून शाश्वत मानकर हा भंडारी श्रीचा (2020-2022) मानकरी ठरत आहे. नुकतीच त्याने महाराष्ट्र श्रीमान स्पर्धेत हट्ट्रीक मिळवली आहे.
रत्नागिरी हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या अधिपत्याखाली ही स्पर्धा घेण्यात आली. भंडारी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश नार्वेकर, कमिटी प्रमुख अभि विलणकर व त्यांचे सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button