
राजकीय हस्तक्षेपामुळे ठाणे एसटी नियंत्रक विभागातून १५० चालक-वाहक, लिपिक आणि मेकॅनिक बदली करून मूळ गावी
नव्या वर्षाच्या सुरुवातीला राजकीराजकीय हस्तक्षेपामुळे ठाणे नियंत्रक विभागातून १५० चालक-वाहक, लिपिक आणि मेकॅनिक य हस्तक्षेपामुळे ठाणे नियंत्रक विभागातून १५० चालक-वाहक, लिपिक आणि मेकॅनिक यांनी आपापल्या मूळ गावी बदली करून घेतल्याने कर्मचाऱ्यांची चणचण भासू लागली आहे.होळीचा सण तोंडावर असताना कर्मचाऱ्यांनाच डबल ड्युटी करावी लागणार आहे.
केवळ ठाणे विभागच नव्हे तर पालघर, रायगड आणि मुंबई या कोकणपट्ट्यातही कर्मचारीटंचाई जाणवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे आगारात आधीच २८० ते ३०० हून अधिक रिक्त पदे आहेत. त्यातच जवळपास १५० कर्मचारी नव्या वर्षाच्या सुरुवातीला विनंती अर्जानुसार कार्यमुक्त केल्याने रिक्त पदांची संख्या वाढली. होळीला कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. परिणामी जादा गाड्या सोडाव्या लागतात. मात्र, गाड्या सोडल्या तरी अतिरिक्त मनुष्यबळ आणायचे कुठून हा प्रश्न आहे