
नाणीजला गजानन महाराज प्रकट दिन सोहळामंत्री, खासदार, आमदारांचे सत्कार याग, मिरवणुका, प्रवचन कार्यक्रम.
श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे गुरुवारी (ता. २०) संतशिरोमणी गजानन महाराज यांचा प्रकट दिन आणि आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांच्या जयंतीनिमित्त वारी उत्सवाचे आयोजन केले आहे.शोभायात्रा, याग, मिरवणुका, प्रवचन असे कार्यक्रम होणार आहेत. या वेळी खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदरविकास मंत्री नीतेश राणे, गृहराज्य मंत्री योगेश कदम, आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत यांचा सत्कार करण्यात येणार आहे.संतशिरोमणी गजानन महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्याला बुधवारी सकाळी महामृत्युंजय सप्तचिरंजीव यागाने सुरुवात होईल. सकाळी ११ वाजल्यापासून वाजतगाजत निमंत्रण मिरवणुका सुरू होतील. सुंदरगडावरील संतशिरोमणी गजानन महाराज मंदिर ते प्रभू श्रीरामचंद्र मंदिर अशी मिरवणूक निघेल. दुपारी बारा वाजता नाथांचे माहेरते वरद चिंतामणी मंदिर ते प्रभू रामचंद्र मंदिर ते संतशिरोमणी गजानन महाराज मंदिर अशी मिरवणूक निघणार आहे. रात्री सुंदरगडावर सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
गुरुवारी सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. या दिवशी सकाळी ९ वाजता नाथांचे माहेर येथून शोभायात्रा सुरू होईल. ही शोभायात्रा संपूर्ण उत्सवाचे आकर्षण आहे. ढोलताशांचा गजर, लेझीम नृत्य, त्या त्या भागातील वाद्यांचे सुरेल ताल, विविध राज्यांतील लोककला दाखवणारी पथके, अनेक सजीव देखाव्यांचे रथ, चित्ररथ, गुजराथ, कर्नाटकमधील कला दाखवणारी पथके, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज, प. पू. कानिफनाथ महाराज यांचा रथ, देशभरातील विविध आखाड्यांचे साधूसंत यांचा स्वतंत्र रथ अशीअवर्णनीय अशी ही शोभायात्रा असेल. त्यानंतर कोकणातील नेत्यांचा सत्कार होईल. त्यानंतर उत्कृष्ट पथकांचा व रक्तदान शिबिर काळात उत्तम कामगिरी केलेल्यांचा सत्कार केला जाणार आहे. रात्री प. पू. कानिफनाथ महाराज आणि जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे प्रवचन होईल.