
सरपंच संघटना विधानसभेच्या २८८ जागा लढवणार.
विद्यमान सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरपंचांसह ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक आणि इतर कर्मचारी यांच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य केल्या नाहीत तर संपूर्ण राज्यभर अपक्ष म्हणून सरपंच पक्षातर्फे विधानसभेच्या २८८ जागा सरपंच संघटनेतर्फे लढवण्यात येतील, असे सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर करीत आझाद मैदानावरील केलेल्या धरणे आंदोलनातून एकमुखी ठराव करण्यात आला. www.konkantoday.com