
सिंधुदुर्गात पर्यटनावर आधारित उद्योग उभारणे आवश्यक- वल्सा नायर-सिंह.
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटनावर आधारित अधिकाधिक उद्योग व्यवसाय या जिल्ह्यात उभे राहणे आवश्यक आहे.विविध क्षेत्रांत अग्रेसर असणाऱ्या या जिल्ह्यात प्रचंड क्षमता आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारीही विकासाचा दृष्टिकोन असलेले आहेत. सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासह त्यांच्या समस्यांवर सहजासहजी तोडगा कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश अपर मुख्य सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालक सचिव वल्सा नायर-सिंह यांनी दिले.