कोकणातील शेतकरी बागायतदारांना जनरल दराने वीज आकारणी करण्याचा डाव,कोकणातील बागायतदार शेतकर्यांवर अन्याय

शासनाकडे कोकणवासीय आग्रहाने कोणतीच मागणी करत नाही अथवा आंदोलने करून मागण्या करत नाही, शासनाने काही निर्णय चांगले घेतले असे शेतकरी कर्जमाफी योजना इ. घेतले आहेत
आज कोकणात पिण्याचे पाणी व शेत बागायतीसाठी पाण्याचे पूर्वापारचे साठे कमी झालेत. पूर्वकाली जुनी तलावे, गोड नदी नाल्यातील पाणी संपले आहे. गोड पाण्याची साठवणूक नसल्याने हे पाणी समुद्राला मिळते. हेच पाणी अंडरग्राऊंड बंधार्‍यांनी अडविणे व शेतीला जोड देणे याकडे शासनाने लक्ष देणे गरजचे आहे. तरी काही भागातून शेती बागायती, भाजीपाला, नारळ कलमे लागवड व जोड धंदा नर्सरी करत आहेत. हे सुरू असताना आर्थिक घडी कोकणी बागायतदारांची बसत चालली असताना हवामानातील बदल यामुळे गेली ४ वर्षे कोकणी शेतकरी बागायतदार कर्जबाजारी झालेला असताना शासनाने अल्प कर्जमाफ केली आहेत त्याबाबत धन्यवाद आहेत
आता कुठे शेतकरी बागायतदारांना दिलासा मिळत असताना शेतकरी बागायतदारांचे शेतीपंप रद्द करून ते बागायतीतील पंप कनेक्शन करून जनरल दराने बिले आकारली जाणार आहेत. गेली ३ वर्षे बिले माफ केली व आता दंडात्मक दराने मागील बिलांची कनेक्शन तोडून वसुली चालली आहे. शेकर्‍यांचे भाजीपाला बागायती, नर्सरीचा पाणी नसल्याने नुकसान होत आहे. विधानसभेत कनेक्शन तोडणे बंद करावे असे ठरले असतानाही हे काम चालू आहे.
आम्ही कोकणी शेतकरी बागायतदार आहोत, आमचे शेती भोवताली नारळ, काजू, आंबा लागवड, भाजीपाला, नर्सरी हे शेती जोडधंदे असताना कोकणातील शेतकर्‍यांना वाढीव दराने शेती पंपाचे विज बिल दिले जाणार हा कोकणावर अन्याय आहे. घाटमाथ्यावर शेतकरी ऊस उत्पादन, नर्सरी झाडे लागवड करत असताना त्यांना शेती पंप विज शेती दर आकारणी हे सर्व गैर आहे
आम्ही आमचे कोकणचे प्रतिनिधी भाजप, सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी वा न्य कुठल्याही पक्षाचे असा, तुम्ही आमचे आहात. आज आपण एक दिलाने विचार करा आपल्या पैकीही शेती बागायतदार असाल, कोकणातील शेती बागायतदारांना अनेक अडचणींतून जावे लागते, बदलते हवामान, लहरी पाऊस याला तोंड द्यावे लागते.
तरी आम्हा शेती बागायती लोकांचे शेती पंप कनेक्शन तोडणे बंद करावे व शेती पंप म्हणूनच यापुढे विजबिले आकारावीत ही आमची आग्रहाची मागणी आपणाकडे आहे. याबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी आंबा बागायतदारांनी व लाइक रायझिंग ग्रुपचे लाइक फोंडू व अन्य सहकार्यानी केली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button