
संकष्टीनिमित्त परजिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांमुळे गणपतीपुढे किनारा गजबजला.
शनिवार, रविवार जोडून शासकीय सुट्टी असल्यामुळे गणपतीपुळेत संकष्टीनिमित्त प्रचंड गर्दी होती. अनेकांनी कालपासूनच केलेला मुक्काम लॉजिंग व्यावसायीकांच्या पथ्यावर पडला. पहाटेपासूनच श्रींच्या मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी होती. दिवसभरात सुमारे ३० हजार पर्यटकांची नोंद झाल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले.बारावी बोर्डाच्या परिक्षा सुरू झाल्या असून दहावीच्या परिक्षाही लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे सध्या पर्यटन व्यवसायाला मंदीचे दिवस आहेत. तरीही रविवारी संकष्टी असल्यामुळे एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक श्रींच्या दर्शनासाठी गणपतीपुळेत दाखल झालेले होते. पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, मुंबईतील पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होती.